दिल्लीमध्ये पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये चकमक, दोघांचे एन्काउंटर

दोन्ही गुन्हेगार मर्डर केसमध्ये वॉटेड होते

नवी दिल्ली | दिल्लीच्या पुल प्रल्हादपूरमध्ये पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये चकमक झाली. सोमवारी सकाळी झालेल्या या एन्काउंटरमध्ये दोन जणांना कंठस्नान घालण्यात आले आहे. राजा कुरैशी आणि रमेश बहादूर असे या दोन्ही आरोपींची नावे आहेत. दोघंही मर्डर केसमध्ये वॉटेड होते. सध्या दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांनी सांगितल्यानुसार, सोमवारी सकाळी पूल प्रल्हारपूद क्षेत्रामध्ये दोन गुन्हेगारांना घेरण्यात आले होते. दोघांनीही पोलिसांवर फायरिंग करण्यास सुरुवात केली. दोन्हीकडून होत असलेल्या फायरिंगमध्ये या गुन्हेगारांना गोळी लागली होती. दोघंही जखमी झाले होते. यानंतर दोघांचाही मृत्यू झाला.AM News Developed by Kalavati Technologies