मंदिराच्या प्रसिद्धीसाठी 1 लाख 64 हजार रुपयांचा अनाठायी खर्च, विश्वस्थ गणेश देशमुख यांचा आरोप

औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग आहे.

हिंगोली । औंढा नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक येथे येतात. याच भाविकांना सुविधा मिळत नसल्याने नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले येथील विश्वस्तने आता नवीनच शक्कल लढवली आहे. मंदिराच्या प्रसिद्धीसाठी चक्क 1 लाख 64 हजार रुपये जाहिरातीसाठी खर्च केल्याचे उघड झाल्याने भक्तांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग आहे. शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी भारतातून येथे भक्त येतात. येथे दर्शनासाठी आलेल्या कडून त्यांना पासच्या नवाखाली पैसे घेऊन दर्शनासाठी सोडल्याने रांगेत उभे राहिलेल्या भक्तांना नाहक त्रास करावा लागत असल्याचा प्रकार याच मंदिरात घडला आहे. विश्वस्त समिती कडून कुठलीही उपाययोजना होत नसल्याचा आरोप करीत महिलांनी देणगी कार्यालयात गर्दी केली असे प्रकार नेहमीच होत असले तरी विश्वस्त मंडळाने मंदिराच्या प्रसिद्धीसाठी 1 लाख 64 हजार रुपये आदी फोटो हिंगोली या नावाने धनादेश दिल्याने नागनाथ भक्तांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. भारतातून अनेक ठिकाणाहून नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येथे येतात, विश्वस्त मंडळाने मंदिराच्या प्रसिद्धीसाठी 1 लाख 64 हजार रुपये हा अनाठायी खर्च कशामुळे केला असा सवाल आता नागनाथ भक्तांकडून व्यक्त केला जातोय. या प्रसिद्धीसाठी दिलेला धनादेश हा काही महिन्यापूर्वी चा असून श्रावण मासात प्रसिद्ध करण्याचे ठरले होते अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली असून श्रावण महिना संपला तरीही अजूनही प्रसिद्धी गेली कुठे हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. नागनाथ  मंदिरातील  विश्वस्त  गणेश  देशमुख  यांना सुद्धा  विश्वासात घेऊन पन्नास हजार रुपये प्रसिद्धीसाठी लागणार असल्याचे सांगितले होते. मात्र एक लाख 64 हजार रुपये हा अनाठायी खर्च करून देखील अजूनही प्रसिद्धी झाली नसल्याचा आरोप गणेश देशमुख यांनी केला आहे. गणेश देशमुख यांनी हा आरोप केल्याने आता  संस्थान मधील हा विषय चर्चेचा ठरत आहे.AM News Developed by Kalavati Technologies