हिंगणघाटमधील नांदगांव चौक येथे ट्रकचा अपघात, अपघातात चालकाचा मृत्यू

सुरक्षित अंतर न राखता वाहन चालविल्यामुळेच सदर अपघात झाल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली आहे.

वर्धा | जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नांदगांव चौकात आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे आलु घेऊन जात असलेल्या दोन ट्रकचा अपघात झाला. या अपघातात ट्रकचालक अमोल मोहन यादव (वय 30 वर्ष) रा. ललितपुर (उत्तरप्रदेश) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

माहितीनुसार मृत अमोल यादव व त्याचा मित्र दोघेही उत्तर प्रदेशातुन वेगवेगळ्या ट्रकने आलुचा माल घेऊन गुंटूर येथे जात असतांना राष्ट्रीय महामार्गावरुन निघाले होते. नांदगांव चौकाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम चालु असल्याने स्पीड ब्रेकर्स लावलेले आहेत. ब्रेकर असल्याने समोरच्या  ट्रकचालकाने ब्रेक लावल्याने पाठीमागेच असलेल्या ट्रक चालक अमोल यादवने समोरच्या ट्रकला धड़क दिल्याने अपघात झाला. या अपघातात ट्रकचालक अमोल यादव हा गंभीर जखमी झाला. दरम्यान त्याला तातडीने उपचारासाठी हिंगणघाट येथिल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, उपचार दरम्यान अमोल मोहन यादव यांचा मृत्यू झाला.सुरक्षित अंतर न राखता वाहन चालविल्यामुळेच सदर अपघात झाल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies