आदिवासी महिलांबद्दल आक्षेपार्ह टिकटॉक व्हिडिओ बनविल्याने आदिवासी संघटना आक्रमक

संबंधितावर सायबर क्राईम व अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे

नाशिक । पेठ तालूक्यातील आदिवासी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले असल्याचा व्हिडिओ टिकटॉकद्वारे सोशल मिडियावर व्हायरल होत असून पेठ-दिंडोरी आदिवासी बांधव या प्रकारमुळे संतप्त झाले आहे. पेठ तालुक्यातील महिलांनी एकत्र येऊन आज संबधित व्यक्तीचा फोटो जाळून तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

tik tok वर पेठ आदिवासी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांविरोधात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्यावतीने पेठ पोलिसांना तर भारतीय ट्रायबल पार्टीच्या वतीने दिंडोरी पोलिसात दि. 15 रोजी निवेदन दिले असून संबंधितावर सायबर क्राईम व अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

पेठ येथील आंदोलन व दिंडोरी येथे पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, महिला आघाडी प्रमुख,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, भारतीय ट्रायबल पार्टी ,मित्र मेळा ग्रुप,टायगर ग्रुप सर्व आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.



AM News Developed by Kalavati Technologies