संचारबंदीत चक्क दुधाच्या टॅंकरमधून प्रवास, चालकासह 12 जण पोलिसांच्या ताब्यात

चक्क दुधाच्या टॅंकरमधून 12 प्रवासी प्रवास करत असल्याची घटना पालघरमध्ये उघडकीस आली आहे

पालघर | संचारबंदी असल्याने राज्यात सगळीकडे वाहतूक बंदी करण्यात आली आहे. मात्र नागरिक आपआपल्या गावाकडे जाण्यासाठी काही ना काही पर्याय शोधून काढतांना दिसून आहे. अशीच एक घटना पालघरमध्ये घडली आहे. संचारबंदीत चक्क दुधाच्या टॅंकरमधून बसून जीवघेणा प्रवास नागरिक करतांना दिसून आले आहे. दुधाच्या टँकरमधुन चक्क कामगारांना गावी घेवून जात असल्याचा प्रकार तलासरीत उघड झाला आहे. कल्याणहून राजस्थानकडे दुधाच्या टँकमध्ये कामगारांना बसवून घेवून जात असताना तपासणी दरम्यान तलासरी पोलिसांनी कारवाई केली आहे.

हे कामगार 12 कल्याणहून राजस्थानला जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान पालघर पोलिसांची टॅंकरची तपासणी केली असता त्यांना हा प्रकार उघडकीस आला आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असुन राज्याच्या सीमा सील असल्याने टँकर चालक नवीन शक्कल लढवताना दिसत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी टँकरचालकासह 12 कामगारांना ताब्यात घेतले आहे.AM News Developed by Kalavati Technologies