पुणे-बेंगळुरू हायवेवरील वाहतूक सुरू, अवजड वाहतूकीचा मार्ग मोकळा

महामार्गावर अजूनही दीड फूट पाणी असल्याचे वृत्त आहे.

कोल्हापूर | पुणे बंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावर आठ दिवसानंतर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून अवजड वाहतूकीचा मार्ग मोकळा करण्यात आला. शिरोलीतून कोल्हापूरमध्ये जाण्यासाठी फक्त अवजड वाहतुकीला हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. मात्र कर्नाटकातून कोल्हापूरच्या दिशेने येणारी वाहतूक अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. महामार्गाची पाहणी करून दुपारनंतर ही वाहतूक सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. महामार्गावर अजूनही दीड फूट पाणी असल्याचे माहिती समोर येत आहे.

कोल्हापूर परिसरात महापूराने थैमान घातले. यामध्ये हजारो नागरिकांना स्थलांतर करावी लागले. पडलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी 5 ऑगस्ट रोजी महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक तात्पूर्ती बंद करण्यात आली होती. यानंतर तब्बल आठ दिवस या महामार्गावर पाणी साचलेले होते. यामुळे दोन्ही बाजूस पंचवीस हजाराहून अधिक वाहने अडकून पडलेली होती. या वाहनधारकांची कोल्हापूरमधील आजूबाजूच्या गावातील नागरिकांकडून जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. आता आठ दिवसांनी ही वाहतूक पूर्ववत सुरू झाल्याने वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.




AM News Developed by Kalavati Technologies