विधानसभा निवडणूक : सायंकाळी पारोळ्यात शरद पवारांची जाहीर सभा

दसऱ्याच्या मुहूर्तावर आज दुपारी पाच वाजता किसान महाविद्यालयाचे प्रांगणात सभा होणार आहे.

जळगाव | पारोळ्यात आज शरद पवारांची जाहीर सभा आज होणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (कवाडेगट), शेकाप, स्वाभिमान संघटना समाजवादी मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार डॉ. सतीष पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभ निमित्ताने माजी कृषी मंत्री शरद पवार जाहीर सभा बोलावण्यात आली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर आज दुपारी पाच वाजता किसान महाविद्यालयाचे प्रांगणात सभा होणार आहे. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी खासदार वसंतराव मोरे, अल्पसंख्यांक माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह महाआघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

आज अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर आणि जळगाव जिल्ह्यातील पारोळा या ठिकाणी पवार सभा घेतील. अकोला जिल्ह्यातील बाळापूरला तर वाशिम जिल्ह्यातील मानोरा आणि कारंजा या ठिकाणी 9 ऑक्टोबरला तर 10 ऑक्टोबर रोजी हिंगणघाट, बुटीबोरी- हिंगणा आणि काटोल या ठिकाणी पवारांच्या सभा होणार आहेत.AM News Developed by Kalavati Technologies