आज मराठी राज्यभाषा दिन, जाणुन घेऊया थोडक्यात माहिती

इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे मराठीसह अनेक प्रादेशिक भाषा हरवत चालल्या आहेत.

मुंबई | 27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक स्तरावर मराठी राजभाषा दिवस म्हणून ओळखला जातो. ज्येष्ठ साहित्यिक कवी म्हणजेच कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे यांचा जन्मदिन मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा महाराष्ट्र आणि गोवा राज्याची अधिकृत भाषा आहे. महाराष्ट्राची राजभाषा म्हणून मराठीची ओळख आहे. मात्र अजुनही मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला नाहीये. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांना 1987 साली ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य विश्वातला मानाचा पुरस्कार मानला जातो. त्यानंतर कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. तेव्हापासून 27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पातळीवर मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

जागतिकीकरणाच्या आजच्या युगात इंग्रजी भाषेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. इंग्रजी भाषेच्या या प्रभावामुळे मराठीसह अनेक प्रादेशिक भाषा हरवत चालल्या आहेत. त्यामुळे मराठी भाषेतील लिखाण साहित्यिकाच्या विश्वास कमी होत चालले आहे. मराठी भाषेवर आलेले संकट मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. प्रामुख्याने मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी भाषा टिकुन राहावी याची आठवण करून दिली जाते. त्यासाठी शालेय स्तरापासून प्रशासकीय स्तरांवर विविध स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. राज्यात मराठी भाषेचा प्रभाव कमी होत असल्याचे पाहून राज्य सरकारने मराठी शाळेसह इंग्रजी शाळांना मराठी भाषेत शिक्षण देणे अनिवार्य केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies