औरंगाबादेत आज 77 रुग्णांची वाढ, एकूण रुग्णसंख्या पोहोचली 7017

जिल्ह्यात 3128 रुग्णांवर उपचार सुरू, आतापर्यंत 318 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद । औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 77 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 72 तर ग्रामीण भागातील 05 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये 37 पुरूष तर 40 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 7017 कोरोनाबाधित आढळले असुन, त्यापैकी 3571 रुग्ण बरे झालेले असून, 318 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाले आहे. सध्या 3128 जणांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या 725 स्वॅबपैकी आज 77 अहवाल सकारात्मक (Positive) आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण – (72)

घाटी परिसर (1), बेगमपुरा (4), सुरेवाडी (1), पिसादेवी, गौतम नगर (3), बड्डीलेन (2), जटवाडा रोड (3), कांचनवाडी (1), आंबेडकर नगर,एन सात (20), सातारा परिसर (4), विष्णू नगर (2), न्यू हनुमान नगर (1), विजय नगर (11), विशाल नगर (1), गौतम नगर (1), लोटा कारंजा (2), नागेश्वरवाडी (3), नारळीबाग (6), एकनाथ नगर (3), चेलिपुरा काझीवाडा (2), सिव्हिल हॉस्पीटल परिसर (1)

ग्रामीण भागातील रूग्ण - (5)

हतनूर, कन्नड (1), विवेकानंद कॉलनी, फुलंब्री (4) या भागातील कोरोनाबाधित आहेतAM News Developed by Kalavati Technologies