अकोल्यात आणखी 42 जणांना कोरोनाची लागण, दिवसभरात 72 पॉझिटिव्ह रुग्ण

अकोल्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

अकोला | अकोल्यात आणखी ४२ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. आज दिवसभरात ७२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण ५०७ वर गेली आहे. आज दिवसभरात पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात २९ महिला तर ४३ पुरुष रुग्ण आहेत. त्यातील १३ जण हे हरिहर पेठ, अकोट फैल येथील ११, रामदास पेठ येथील पाच, माळीपुरा येथील पाच, मुर्तिजापूर येथील तीन, फिरदौस कॉलनी येथील तीन, मोहता मिल प्लॉट दोन, नाजुकनगर दोन, मोठी उमरी दोन, गुलजार पुरा दोन, अशोक नगर येथील दोन, डाबकी रोड दोन, देशमुख फ़ैल दोन, तर खैर मोहम्मद प्लॉट, राहुलनगर शिवनी, तेलीपुरा, लेबर कॉलनी तारफैल, सहकार नगर, डाबकी रोड, वृंदावन नगर, चांदखा प्लॉट वाशिम बायपास, रणपिसे नगर, महसूल कॉलनी, रजतपुरा, गायत्रीनगर, सिंधी कॅम्प, गर्ल्स होस्टेल आरटीएएम, शिवसेना वसाहत, संताजीनगर, जठारपेठ, न्यू तारफैल, गुलिस्तान कॉलनी, मोमीनपुरा येथील प्रत्येकी एक जण आहे. आज दुपारी २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील पाच जणांना घरी तर उर्वरित २१ जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. सद्यस्थितीला जिल्ह्यात १६४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies