Corona Virus; नवी मुंबईत दिवसभरात 85 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

दिवसभरात 52 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

नवी मुंबई |  नवी मुंबईत आज दिवसभरात 85 रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळं शहरातील रुग्णांचा आकडा 1 हजार 646 वर गेला आहे. तसेच आज एका जणाचा कोरोनामुळं मृत्यू झाला असून मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 52 झाली आहे. आज नव्याने आढळून आलेल्या 85 रुग्णांमधील बेलापूर 6 रुग्ण, नेरुळ 9 रुग्ण, वाशी 5 रुग्ण, तुर्भे 17 रुग्ण, कोपेरखेरने 18 रुग्ण, घणसोली 19 रुग्ण, ऐरोली 7 रुग्ण, आणि दिघामधील 4 रुग्णांचा समावेश आहे. तसेच दिवसभरात 52 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 774 रुग्ण या आजारातून बरे झाले आहे.AM News Developed by Kalavati Technologies