जळगावकरांच्या चिंतेत भर; दिवसभरात 29 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

जिल्ह्यात आज दिवसभरात 29 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव | जिल्ह्यात आज दिवसभरात 29 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 557 वर पोहचली आहे. आज जिल्ह्यातील भडगाव, नशीराबाद, चोपडा, सावदा, भुसावळ, जळगाव येथील 149 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले असून त्यातील 120 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भडगावचे 4, चोपडा, सावदा, भुसावळ, उमाळा, विटनेर येथील प्रत्येकी 1 - 1 तर जळगाव शहरातील जखनीनगर, तांबापुरा, सलगार नगर व इतर भागातील 20 जणांचा समावेश आहे. व्यक्तींचा समावेश आहे.AM News Developed by Kalavati Technologies