पालघर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख, आज 265 नव्या रुग्णांची नोंद, 3 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतपर्यंत 330 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे

पालघर | जिल्ह्यात कोरोना व्हायरसने मोठा हाहाकार घातला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसून येत आहे. आज दिवसभरामध्ये जिल्ह्यात 265 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर याच कालावधीत 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज नव्याने वाढलेल्या कोरोना रुग्णांमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 104 रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आज नव्याने पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा आता 16 हजार 978 वर पोहचला आहे. यामध्ये आजवर 330 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये 3 हजार 437 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत 13 हजार 211 रुग्ण वैद्यकीय उपचारानंतर बरे झाले आहेत.



AM News Developed by Kalavati Technologies