कल्याण डोंबिवलीत दिवसभरात कोरोनाचे 239 रुग्ण, 9 जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 421 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

ठाणे | कल्याण डोंबिवलीत कोरोना व्हायरसने मोठं थैमान घातलं आहे. महापालिका क्षेत्रात गेल्या 24 तासात 239 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर याचदरम्यान 9 जणांचा मृत्युही झाला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 21 हजार 846 इतकी झाली असून यामध्ये आतापर्यंत 421 जणांचा बळी गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आजवर 16 हजार 779 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान आज नव्याने पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेत - 43 रुग्ण, कल्याण पश्चिम.- 63 रुग्ण, डोंबिवली पूर्व - 62 रुग्ण, डोंबिवली पश्चिम.- 50 रुग्ण, मांडा टिटवाळा - 15 रुग्ण, मोहना - 05 रुग्ण, आणि पिसावलीमधील एका रुग्णाचा समावेश आहे.AM News Developed by Kalavati Technologies