Corona Updates; नागपूरात दिवसभरात 13 नवे रुग्ण आढळले

आज दोन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे

नागपूर | आज दिवसभरात नागपूरात 13 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर 2 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागपूरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 514 झाली आहे. तर 11 कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 6 भानखेडा, 2 सतरंजीपुरा परिसरातले असून 1 तांडापेठ तर 1 एसआरपीएफ कॅम्प मधील जवान आहे. तर 2 रुग्ण नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील आहेत. नरखेड तालुक्यातील मन्नाथखेडी गावातील हे दोघे 1 आठवड्यापूर्वी मुंबईतून गावात परतले होते. त्यामुळे मुंबई मधून परतणाऱ्या पासून ग्रामीण भागात कोरोना ची एन्ट्री होत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.. सोबतच हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथे देखील आज एकजण कोरोनाबाधित रुग्ण समोर आला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये 4 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका भिक्षेकऱ्याचा व एका 74 वर्षीय गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचा समावेश आहे.AM News Developed by Kalavati Technologies