Corona Virus; जळगावात कोरोनाचे 13 नवे रुग्ण आढळले

जिल्ह्यात आज 13 नवे कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे.

जळगाव | जिल्ह्यात आज 13 नवे कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 441 झाली आहे. आज भुसावळ, धरणगाव, जळगाव, एरंडोल, भडगाव, अमळनेर येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 30 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यामध्ये 17 व्यक्तीचा तपासणी अहवाल हा निगेटिव्ह आला असून यामध्ये 13 जण पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ शहरातील 5, अमळनेर येथील 2, जळगाव येथील 3, तर तळवेल, ता. भुसावळ, एरंडोल व भडगाव येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.AM News Developed by Kalavati Technologies