अकोल्यात आज 12 कोरोनाबाधित आढळले, एकाचा मृत्यू

अकोल्यात कोरोनाचे आज 12 नवे रुग्ण आढळले आहेत

अकोला | अकोल्यात आजच्या प्राप्त एकूण अहवालात 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये 9 महिला तर 3 पुरुष आहेत. यातील तीन जण अकोट येथील, तेल्हारा,बोरगाव व पारस येथील प्रत्येकी दोन तर सातव चौक, बाळापूर व वाशीम बायपास येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. दरम्यान, उपचार घेताना वाशीम बायपास येथील 60 वर्षीय महिलेचा आज पहाटे मृत्यू झाला. या महिलेस दि. 30 जून रोजी उपचारासाठी भरती करण्यात आले होते.

दरम्यान आजच्या 12 रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 791 इतकी झाली असून आतापर्यंत 1 हजार 333 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर या आजाराने आजवर 90 जणांचा बळी घेतला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात 367 रुग्णांवर उपचार सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies