माजलगाव धरणात बोट उलटल्याने तीन जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

माजलगाव धरणात अचानक बोट पलटी झाल्याने तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे

बीड । माजलगाव धरणात छोट्या बोटीने प्रवास करत असतांना बोट पलटी होऊन, पाच जण बुडाले होते. त्यापैकी दोन जण बचावले आहेत. तर तीन जण पाण्यात वाहून गेले. या बुडाल्यापैकी गुरुवारी रात्री अकरा वाजता दोघांचा तर शनिवारी दुपारी साडे बारा वाजता एकाचा मृतदेह सापडला असून प्रशासनाकडून शोध मोहिमेला यश मिळाले आहे. या घटनेने तालुक्यासह जिल्हा सुन्न झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवारी माजलगाव धरणात छोट्या बोटीने सायंकाळी पाच वाजता घरी परतत असतांना अचानक बोट पलटी होऊन एकाच घरातील पाच जण पाण्यात बुडाल्याची घटना घडली. यामध्ये भारत राजेभाऊ फरताडे व त्यांच्या सासु अंतिका इंद्रजीत नाईकवाडे यांना पोहणे येत असल्याने, त्यांना सुखरुप पाण्याबाहेर येता आले.

मात्र पत्नी सुशिला भारत फरताडे (वय-27) मुलगा आर्यन भारत फरताडे (वय-7) या माय-लेकराचा रात्री अकरा वाजता मदत शोध मोहिमेत मृतदेह सापडला. तर भाच्ची असणारी चिमकुली पुजा राजेभाऊ काळे (वय-8) रा.माली पारगांव हिचा घटना घडल्यानंतर मृतदेह आढळून न आल्याने तिचा शोध घेण्यासाठी प्रशासनासह नागरिक जिवाची परिकाष्ठा करत होते. रात्रभर मदत कार्य सुरु ठेवले तरीही मृतदेह आढळून आला नाही. अखेर शनिवारी हा तिसरा मृतदेह वडवणी तालुक्यात सापडला. या घटनेने वडवणी तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.AM News Developed by Kalavati Technologies