सॅनिटायझरचा अवैध्यरित्या साठा करून चढ्या भावात विक्री, तीन जणांना अटक

सॅनिटायझरचा साठा करून चढ्या भावात विक्री, तीन जणांना अटक

मुंबई | मुंबईत पुन्हा एकदा सॅनिटायझरचा काळाबाजार उघडकीस आला आहे. मुंबईतल्या माहीम परिसरात गुन्हे शाखेने धाड टाकून बेकायदेशीररित्या साठवण्यात आलेल्या सॅनिटायझरचा 2 लाख 50 हजारांचा साठा हस्तगत केला आहे. याप्रकरणी एकूण तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. विराज गौरंग धारिया(वय 20), जैनाम हरेश देढीया(वय 21),नीरज रजनीकांत व्यास (वय 49) अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. हे व्यक्ती सॅनिटायझरची चढ्या भावाने विक्री करत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून 2 लाख 50 हजारांचा साठा जप्त केला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.AM News Developed by Kalavati Technologies