पाकिस्तानातून कांदा आयात करणाऱ्यांनी आम्हाला देशहित सांगू नये- नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाकिस्तानच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाकिस्तानच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. शरद पवार यांनी पाकिस्तान धार्जिने वक्तव्य करू नये असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी व्यक्त केले होते. त्याला आता राष्ट्रवादीने देखील प्रतिउत्तर दिले आहे. जे लोक पाकिस्तानातून कांदा आयात करतात त्यांना शरद पवार यांच्यावर प्रश्न उभे करण्याचा अधिकार नाही असे मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. देशहित काय असते हे आमच्या नेत्यांना कळते उलट ज्या लोकांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना उध्वस्त करून पाकिस्तानच्या शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी तिकडचा कांदा आणत आहेत. त्यांनी आम्हाला देशहित सांगू नये अशी टीका देखील नवाब मलिक यांनी केली आहेAM News Developed by Kalavati Technologies