निवडणूका झाल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी - उद्धव ठाकरे

‘ते’ थोरात तर आम्ही जोरात, काँग्रेस-राष्ट्रवादीचे बारा वाजवणारच; उद्धव ठाकरेंनी संगमनेरमध्ये तोफ डागली

संगमनेर । स्वत:ला वीर बाजीप्रभूंची उपमा देणाऱ्या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. नवले यांच्या प्रचारासभेसाठी संगमनेरमध्ये दाखल झालेल्या उद्धव ठाकरे यांनी सभेत बोलाताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टिका केली. ‘ते’ थोरात तर आम्ही जोरात असे म्हणत त्यांनी संगमनेरसह संपूर्ण नगर जिल्हा भगवा करणारच असा विश्वास बोलून दाखवला.  उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अहमदनगरमधील संगमनेरमध्ये भाजप-शिवसेना युतीची प्रचारसभा झाली. या सभेत त्यांनी काँग्रेससह प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी उद्धव यांनी सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडलं. सुशीलकुमार शिंदे म्हणाले की दोन्ही काँग्रेस थकले आहेत. कदाचित खाऊन खाऊन थकले असतील, असं उद्धव म्हणाले. निवडणूका झाल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी, त्याचबरोबर 10 हजार रुपये मदत करण्याची घोषणा ठाकरे यांनी केली.

उपमा द्यायलासुद्धा संदर्भ असावा लागतो. कुठे छत्रपती शिवाजी महाराज! कुठे बाजीप्रभू देशपांडे! आणि कुठे हे…!’, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली. बाळासाहेब थोरात यांनी आपण काँग्रेसचे बाजीप्रभू देशपांडे आहोत, असा दावा केला होता. त्यांच्या याच दाव्यावरुन उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संगमनेरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुकले आहे. यावेळी त्यांनी संगमनेरचे काँग्रेस उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.

थोरात यांनी स्वत:ला बाजीप्रभू देशपांडे यांची उपमा दिली होती. त्यावर उद्धव ठाकरे आजच्या सभेत कडाडले. कुणाला कोणती उपमा द्यायची त्यासाठी आपण तितके समर्थ असायला पाहिजे असे ते म्हणाले. वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवरायांसाठी, प्राणांची बाजी लावली होती म्हणून ते बाजीप्रभू. राजे गडावर पोहचल्यावर त्यांनी आपले प्राण सोडले. त्यांच्याशी तुम्ही स्वत:ची तुलना कशी करता. निवडणुकीच्या तोंडावर यांना वीर बाजीप्रमू आठवले. थोरातांच्या करामती साऱ्यांनाच माहीत आहे, असं म्हणतानाच ते म्हणाले की त्यांना नाही अब्रू तर मी बोलायला कशाला घाबरू, असे म्हणताच सभास्थळी हशा पिकला. ‘तुमचा नेता बँकॉकला पोहचला आहे, तेव्हा आता तुम्ही निर्धास्त घरी जा’, असे म्हणत त्यांनी काँग्रेस नेते थोरात यांना सणसणीत टोला हाणला.AM News Developed by Kalavati Technologies