हीच ती वेळ । म्हणजे गेली 5 वर्ष नव्हता का यांना वेळ?, राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला

मनसेकडे दाद मागितली तर न्याय मिळतोच म्हणून लोकं आमच्याकडे कुठलाही नागरी प्रश्न अडला तर येतात

दहिसर । महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची दहिसरमध्ये येथे सभा झाली. यावेळी राज ठाकरे यांनी भाजप शिवसेना सरकारवर जोरदार तीव्र शब्दांत टीका केली आहे. शिवसेना-भाजपच्या जाहिराती पहा, सगळीकडे लिहिलंय 'हीच ती वेळ' म्हणजे गेली 5 वर्ष नव्हता का ह्यांना वेळ? ह्या नेत्यांच्या आर्थिक हितसंबंधांची फक्त राजीनाम्याच्या धमक्या दिल्या गेल्या. अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.

पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे दाद मागितली तर न्याय मिळतोच म्हणून लोकं आमच्याकडे कुठलाही नागरी प्रश्न अडला तर येतात आणि आम्ही आंदोलनं करतो आणि न्याय मिळवून देतो.  2014 च्या जाहीरनाम्यात सांगतात की, सहकाराला बळकट करण्यासाठी आणि ह्या व्यवस्थेतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी विशेष कायदा आणू असं भाजप म्हणाले आणि जी पीएमसी बँक बुडली त्यावर भाजपचे नेते आहेत आणि सिटी कॉऑप बँकेवर शिवसेनेचे नेते आणि हे गप्पा मारतात भ्रष्टाचार दूर करण्याच्या.AM News Developed by Kalavati Technologies