'या' अभिनेत्रीला होतोय लग्न न करता मुलीला जन्म दिल्याचा पश्चाताप

मी लग्नाशिवाय मुलाबद्दल विचार करायला नको होता. मुलाला दोन्ही पालकांची आवश्यकता असते.

नवी दिल्ली ।  अभिनेत्री नीना गुप्ताला तिच्या अभिनयामुळे आज बरीच ओळख मिळाली आहे. या अभिनेत्रीने इंडस्ट्रीत बरीच वाटचाल केली आहे आणि तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. परंतु तिचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य खूप चढउतारांनी भरलेले होते. या अभिनेत्रीला मसाबा नावाची एक मुलगी आहे. आता याच गोष्टीची खंत अभिनेत्री नीना गुप्ता करत आहे. नीना गुप्ता यांनी यामागील कारण काय आहे ते सांगितले.

नीना म्हणाली- मी लग्नाशिवाय मुलाबद्दल विचार करायला नको होता. मुलाला दोन्ही पालकांची आवश्यकता असते. मी मसाबाशी नेहमीच प्रामाणिक राहिले आहे जेणेकरून तिच्याशी असलेल्या माझ्या नातेसंबंधावर परिणाम होणार नाही. पण मला माहित आहे की तिने आपल्या वडिलांना नक्कीच मिस केले असेल. मसाबा नीना गुप्ता ही वेस्ट इंडीयन क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू विव्हियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. 2 नोव्हेंबर 1988 रोजी नीना गुप्ताची मुलगी मसाबाचा जन्म झाला. नीना आणि व्हिव्हियन रिलेशनशिपमध्ये होते पण दोघांनी कधी लग्न केले नाही.AM News Developed by Kalavati Technologies