नंदुरबारमध्ये असणार प्रत्येक रविवारी एकदिवसीय लॉकडाउन

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले बंदचे आदेश

नंदुरबार । नंदुरबार शहरात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नंदुरबारमध्ये जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशानुसार आता प्रत्येक रविवारी एक दिवसीय बंद पाळल्या जाणार आहे. आज सकाळपासुनच नंदुरबार शहरातील व्यापारी प्रतिष्ठाणे बंद ठेवत नागरीकांनी देखील घरातच राहत या बंदला चांगला पाठींबा दिल्याचे चित्र आहे. शहराच्या प्रवेशद्वारावरील प्रत्येक चौफुलीवर तैणात पोलीस बाहेरुन येणाऱ्या वाहनांना शहरात बंदी घालत आहे. वैद्यकीय सेवा वगळता आज नंदुरबार शहरात कडकडीत बंद दिसुन आला आहे.

आतापर्यत नंदुरबार जिल्ह्यात २४८ कोरोनाबाधित आढळुन आले असुन, यातील पन्नास टक्यांहुन अधिक बाधित हे शहरातील असल्याने आज बंदचा पवित्रा घेण्यात आला आहे. आतापर्यत १० जणांचा उपचार दरम्यान मृत्यु झाला असुन जवळपास १५१ जण हे संसर्गमुक्त होत घरी परतले आहे. तर जवळपास ८७ अ‍ॅटीव्ह बाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत प्रत्येक रविवारी आता सवयीचा भाग म्हणून या पद्धतीने संचारबंदीचे पालन करावे असे आवाहन नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे.AM News Developed by Kalavati Technologies