मुंबईमधून डॉक्टरांची समिती सांगलीत येणार

सांगलीत 12 नवीन कोरोना बाधित रुग्ण

सांगली | सांगली जिल्ह्यात कोरोना बाबत उपाययोजना करण्यासाठी मुंबईमधून डॉक्टरांची समिती सांगलीत येणार आहे. या समितीत तीन जण असणार आहेत.
1) डॉ. पल्लवी साफळे, (अधिष्ठाता, जे जे हॉस्पिटल), यापूर्वी मिरजेत अधिष्ठाता होत्या. 2) डॉ. विनायक सावर्डेकर,
3) डॉ. प्रशांत होवाळ, डॉ. पल्लवी साफळे यांच्याकडे मिरजेच्या शासकीय वैदकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील अधिष्ठाता (डीन) पदाचा चार्ज मिळणार आहे. डॉ. सुधीर नंणदरकर - विद्यमान अधिष्ठाता - मिरजेच्या शासकीय वैदकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील आर्थिक अधिकार राहणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यात कोरोना व्हायरसने आपले हातपाय पसरवण्यास सुरूवात केली आहे. सांगलीत 12 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सांगलीतल्या इस्लामपूर कुटुंबातील महिला कोरोना बाधित आढळून आली होती. या महिलेच्या इतर 12 कुटुंबीयाना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात समोर आले आहे. या बाधितांमध्ये 6 महिला आणि 6 पुरूषांचा समावेश आहे.AM News Developed by Kalavati Technologies