मध्यप्रदेश सारखा महाराष्ट्रातही राजकीय भूकंप होऊ शकतो - रामदास आठवले

उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत येण्याचा पुर्नविचार करावा नाहीतर महाराष्ट्रातही मध्यप्रदेश सारखा राजकीय भुकंप येईल - रामदास आठवले

नागपूर |  उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत येण्याचा पुर्नविचार करावा नाहीतर महाराष्ट्रातही मध्यप्रदेश सारखा राजकीय भुकंप येईल असं विधान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. त्यांचे हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलं आहे. नागपूरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केलं आहे. राजकीय परिस्थितीवर बोलताना आठवले म्हणाले की मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपने फोडले नाही. राहुल व सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास नसल्याने शिंदे काँग्रेस मधून बाहेर पडले आहे. मध्यप्रदेशात विश्वास दर्शक ठराव पुढे ढकलण्यात आला आहे पण हे काही ठीक नाही. कमलनाथ यांच्याकडे बहुमत नाही ज्यामुळे मध्य प्रदेशात भाजपचे सरकार लवकर येईल असा दावाही आठवले यांनी केला आहे.

पंतप्रधान मोदींवर राहुल गांधी अनेकदा अनावश्यक टीका करीत असल्याचा आरोपही आठवले यांनी केला आहे. पाकव्याप्त काश्मीर भारत सरकारने ताब्यात घ्यावे अशीही मागणी आठवले यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत स्थापन केलेलं सरकार हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार विरुद्ध आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी एकदा विचार करून पुन्हा भाजप सोबत यावे असेही आठवले म्हंटले आहे. मध्य प्रदेशात जसा राजकीय भूकंप झाला तसाच राजकीय भूकंप महाराष्ट्रात देखील होईल. सोबतच फडणवीस सरकारच्या अनेक निर्णयांना ठाकरे सरकार स्थगिती किंवा बद्दलवण्याचे धोरण योग्य नसल्याची टीका आठवले यांनी केली आहे. फडणवीस सरकारमध्ये शिवसेना देखील सहभागी होती त्यामुळे सरकार कुणाचेही असो सूड उगवण्याचं राजकारण योग्य नसल्याचं रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.AM News Developed by Kalavati Technologies