सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या गिता मावशीची संपूर्ण कहाणी

गिता काळे यांच्या व्हिजि टिंग कार्डला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला, की त्यांना आता स्वतःचा फोनच बंद करून ठेवलाय

पुणे । इंटरनेटच्या जमान्यात क्षणात जगभर काय व्हायरल होऊ शकले याचा अंदाज नाही. व्हॉट्सऍप, फेसबुक, ट्विटरसारख्या माध्यमांचा वापर वाढल्याने अनेक व्हिडीओ आणि फोटो यांचा अक्षरशः दररोज सोशल मीडियावर मोठा पाऊस पडताना दिसतो. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. घरकाम करणाऱ्या गीता काळे या रातोरात जगभर व्हायरल झाल्या आहेत. गीताताई या धनश्री शिंदे यांच्याकडे घरकाम करतात. तिथे त्यांनी एकदा धनश्री यांना अधिक कामांची गरज असल्याचे सांगितले. त्यावर धनश्री यांनी विचार करून त्यांना व्हिजिटिंग कार्डची कल्पना सुचली. त्यांनी ते ताबडतोब डिझाईन केले. त्यावर गीता यांचा मोबाईल नंबर, भांडी घासणे, कपडे धुणे आणि झाडूकामाचे दरही टाकण्यात आले. त्यात अधिक स्पष्टता यावी म्हणून आधार कार्ड नंबरही जोडण्यात आला. प्रत्यक्षात कार्ड हातात आल्यावर धनश्री यांनी ते आपल्या एका स्नेही व्यक्तीला पाठवलं आणि त्यांनी ते एका ग्रुपवर शेअर केलं आणि झालं. मागील दोन दिवसांपासून गीता यांचा फोन फक्त पुणे नाही तर देशभरातून खणखणत आहे.

गिता काळे यांच्या व्हिजि टिंग कार्डला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला. की त्यांना आता स्वतःचा फोनच बंद करून ठेवलाय. हे काय चाललंय आणि कसं झालं याचा अंदाजही त्यांना येत नाहीये. पण त्यांचे व्हिजिटिंग कार्ड मात्र प्रत्येक ग्रुपवर हमखास बघायला मिळत आहे. गीता ताई यांना अधिक घरांचे काम मिळावे म्हणून मी त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने हा प्रयोग केला होता. त्याला मिळणारा प्रतिसाद थक्क करणारा आहे. अस गीता ताई यांचा व्हिजिटिंग कार्ड तयार करणाऱ्या धनश्री यांनी सांगितलं. सोशल मीडियावर वायरल झालेल्या घर काम वाली।मावशी या व्हिजिटिंग कार्ड मुळे गीता काळे यांचा छोटा खाणी का होईना एक स्टार्ट अप सुरू झाला आहे. त्यामुळे भविष्यात गीता ताई यांना योग्य मार्गदर्शन आणि मदत झाल्यास त्या नक्कीच घर काम वाली मावशी ही फर्म स्थापन करून लोकांना देखिल लोकांना रोजगार देऊ शकतील यात शंका नाही.



AM News Developed by Kalavati Technologies