लग्नाचे हॉल बनणार आता क्वारंटाईन सेंटर

कल्याणमध्ये प्रत्येक प्रभागात उभारणार क्वारंटाईन सेंटर, पालिका आयुक्तांनी केली पाहणी

कल्याण । कल्याण पालिकेने सर्वेक्षण आणि टेस्टिंग वाढवल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, या रुग्णांसाठी प्रत्येक प्रभागात क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक प्रभागातील मंगल कार्यलये (लग्नाचे हॉल) ताब्यात घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज बैलबाजार प्रभागातील लग्नाच्या हॉलची आज आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि नगरसेवक प्रकाश पेणकार यांनी पाहणी केली. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रुग्णांवर योग्य उपचार व्हावेत म्हणून पालिकेने विविध उपाययोजना राबवल्या आहेत.

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागात क्वारंटाईन सेंटर उपलब्ध असावे यासाठी केडीएमसीकडून लग्नाचे हॉल ताब्यात घेण्यात आले आहेत. यावेळी आयुक्तांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पालिकेने "चेस द व्हायरस" ही स्ट्रेटजी अवलंबली असून टेस्टिंग व सर्वेक्षण वाढवले आहे. सर्वेदरम्यान तापसदृश्य कोरोना सदृश्य रुग्ण आढळतील त्यांना आयसोलेट करायचे आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागात क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येत आहे. सुमारे 25 हजार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आली असून, डोंबिवली क्रीडा संकुलात 185 वेड चे रुग्णालय आजपासून सुरू करण्यात आले आहे.

तर डोंबिवली जिमखाना येथे 70 वेड चे आयसीयू आणि 51 बेड च ऑक्सिजन, डोंबिवली पाटीदार येथे 200 ऑक्सिजन बेडची तयारी तर कल्याण पश्चिमेकडील आर्ट गॅलरी येथे 125 बेड आयसीयू तर 350 बेड ऑक्सिजन असणार असून, येत्या काही दिवसात हे दोन्ही रुग्णालये सुरू करण्यात येणार आहेत. सद्यास्थितीत 800 ते 900 टेस्ट केल्या जात आहेत. त्या 2000 पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न असून पालिकेच्या लॅब चे काम प्रगती पथावर आहे. प्रत्येक नगरसेवकाने प्रभागात क्वारंटाइन सेंटर शोधावेत ते कोरोना कमिटीद्वारे चालवले जातील असे आवाहन केले.AM News Developed by Kalavati Technologies