प्रतिक्षा संपली! पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार राम मंदिराचं भूमिपूजन..

अयोध्येत ठिकठिकाणी पंतप्रधान मोदी भूमिपूजन करणार असल्याचे मोठ-मोठे फलक लावण्यात आले आहे.

अयोध्या । गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेल्या राम मंदिराचं आज भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 500 वर्षानंतर रामलल्ला जन्मभूमीवर मंदिर पुनर्बांधणीचे स्वप्न साकार होणार आहे. भारतासह जगभरात रामभक्तांचे भव्य राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होण्याची शुभ घटिका दुपारी 12.15.05 ते 12.15.38 ला असेल. 33 सेकंदाच्या या शुभ मुहूर्तात पंतप्रधानांच्या हस्ते 9 पवित्र शिळांचे पुजन होणार आहे. आपल्या आराध्य दैवताच्या मंदिराचे स्वप्न साकार होत असल्याच्या भावनेतून अयोध्येत त्रेतायुगासारखा, रघुनंदन रघुकुलात परतल्यासारखा उत्साह आहे. अयोध्येतील प्रत्येक मार्गावर पंतप्रधान मोदी राममंदिराचं भूमिपूजन करणार असल्याचे मोठ-मोठे फलक सुद्धा लावण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies