धक्कादायक..! मावशीला भेटण्यासाठी आलेल्या 24 वर्षीय तरूणांचा विहरीत बुडून दुर्दैवी मृत्यू

रक्षाबंधनला मावशीकडे आलेल्या तरूणांचा दुर्दैवी मृत्यू; राहुरीतील टाकळीमिया येथील घटना, 4 तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह काढण्यात यश

राहुरी । रक्षाबंधनच्या पुर्व संध्यालाच राहुरीतील टाकळीमिया गावात मावशीला भेटण्यासाठी आलेल्या 24 वर्षीय तरूणाचा विहरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अक्षय रविंद्र ढुस असे मृत तरूणाचे नाव आहे. अक्षय हा आपल्या आई समावेत मावशीच्या भेटीसाठी आला होता. दरम्यान घरासमोरील विहरीत काही तरूण पोहत असल्याने ते पाहण्यासाठी विहरीत डोकावतांना त्याचा तोल जाऊन तो विहरीत पडला. अक्षयला पोहणे येत नसल्यामुळे विहिरीतच त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विहिरीची खोली आणि पाणीपातळी जास्त असल्याने उशीरापर्यंत मृतदेह सापडला नाही. नगरपालिका तसेच शेतीपंपाच्या सहाय्याने 4 तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह विहीरीतून काढण्यात यश आला.AM News Developed by Kalavati Technologies