महामार्गावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी

अपघातात चालकासह दोघेजण जखमी झाले आहेत

नंदूरबार । ब्रहानपूर अंकलेश्वर महामार्गाची दुरवस्था झाली असून आज सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात असलेला ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. या अपघातात चालकासह दोघेजण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तळोदा आणि शहादा पोलिसांनी या महामार्गावरील वाहतूक सुरळीत करून वाहतूक कोंडी सोडविली.

या मार्गावर जवळपास दोन ते चार फुटाचे खड्डे असल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे दररोज अपघात होऊन वाहतूक कोंडीची समस्या कायमची झाली आहे. मात्र महामार्ग प्रशासन आणि सरकार या मार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने तळोदा तालुक्यातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.AM News Developed by Kalavati Technologies