फिर्यादीच निघाला चोर, एकास अटक, दोघे फरार

पोलीस निरीक्षक भागीरथ देशमुख यांनी अवघ्या 24 तासाच्या आत या प्रकरणी छडा लावून सत्य समोर आणले

औरंगाबाद । शुक्रवारी पैठण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी ट्रक चालकास झाडाला बांधून ट्रक पळवून नेल्याची फिर्याद देणारा फिर्यादी ट्रक चालकच या प्रकरणात आरोपी असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण व पैठण पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे.

फिर्यादी ट्रक चालक व त्याचे दोन साथीदार पाथर्डी तालुक्यातील तीसगाव येथील रिलायन्स टॉवरच्या बँटऱ्या चोरून नेत असताना पाथर्डी पोलिसांनी पाठलाग केल्याने ट्रक तेथेच सोडून पळून आले होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ट्रक चालक व त्याच्या दोन साथीदारांनी बनाव रचून पैठण पोलीस ठाण्यात मारहाण करून ट्रक पळवून नेल्याची फिर्याद दिली होती. गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पैठण पोलीस निरीक्षक भागीरथ देशमुख यांनी अवघ्या 24 तासाच्या आत या प्रकरणी छडा लावून सत्य समोर आणले. ट्रक चालक विशाल दुर्बे, यास अटक करण्यात आली असुन त्याचे दोन साथीदार वैभव वरात, मिथुन वर्मा, फरार आहे.AM News Developed by Kalavati Technologies