रस्त्याच्या समस्येसाठी ग्रामस्थांसह प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गाठले तहसील कार्यालय

तातडीने रस्ता दुरुस्तीची केली मागणी

वर्धा । वर्धा जिल्ह्यात वडगाव( हिरडी) या गावात जाणाऱ्या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने येथिल नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी व प्रहार कार्यकर्त्यांनी समुद्रपुर तहसील कार्यालय गाठून तहसिलदारा समोर या रस्त्याची कथा वाचून लवकरात लवकर रस्त्या दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. येथील रस्ता पुर्ण पणे उखडून गेल्याने त्यावर साधी दुचाकीही चालवीने कठीण झाले आहे.गावातील एखाद्या व्यक्ती आजार झाला तर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात कसे न्यायचे हा प्रश्न येथिल नागरिकांन समोर उभा ठाकत आहे. गेल्या दोन वर्षांपासून येथिल नागरिकांनी या रस्ता दुरुस्ती मागणी करीत आहे.

मात्र अजूनपर्यंत या मागणीकडे संबंधित विभागा कडून लक्ष न देता साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील नागरिकांनी केली आहे. आता संबंधित प्रशासनाने जागे होऊन तातडीने ह्या रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर प्रहारच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा ही या निवेदनातून देण्यात आली आहे. निवेदन देते वेळी मोठ्या संख्येने वडगाव (हिरडी) येथिल नागरिकांनसह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies