साताऱ्यात विद्यार्थिनीची सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

कोमल लोखंडे ही फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती

सातारा :  काही वेळापूर्वी विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शहरालगत असलेल्या गौरीशंकर फार्मसी महाविद्यालयातील कोमल लोखंडे ही फार्मसी विभागाच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. तिने काही वेळापूर्वी महाविद्यालयाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या नेमकी का केली हे समजू शकले नाही. पोलीस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत सक्रिय असल्यामुळे कोणताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी न आल्यामुळे इतर विद्यार्थिनींनीच मुलीला अल्टो गाडीतून जिल्हा रुग्णालयात आणले होते.AM News Developed by Kalavati Technologies