कृषीमंत्र्यांनी स्टिंग करुनही युरिया मिळेचना, शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

औरंगाबाद जिल्हातील शेतकऱ्यांची युरीयासाठी धडपड कायम, लिंकींग खताने शेतकऱ्यांची पिळवणुक

गंगापुर । एकीकडे देशात कोरोनाचे संकट हे कायम आहे. कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहे. कोरोनाच्या काळात बहुतांश शेतकऱ्यांचा माल हा शेतातच खराब झाला होता. तरीसुद्धा हार न मानता बळीराजाने पुन्हा नव्याने शेतीती कामे करण्यास सुरुवात केली. वरुण राजानेही चांगली साथ दिली आणि बळीराजाने शेतीच्या कामाला सुरुवात केली. बि-बियाणे खरेदी करुन पिकेही लावली मात्र शेतकऱ्यांना आता एका मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पिकांसाठी युरीया मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

सध्या खताची टंचाई औरंगाबाद जिल्ह्यासह अनेक तालुक्यात भासत आहे. म्हणुनच अनेक व्यापारी खतांसाठी शेतकऱ्यांची पिळवणुक करतांना दिसत आहे. अगदी असाच प्रकार गंगापुर तालुक्यातही पाहायला मिळाला. तालुक्यातील अगर कानडगाव या ठिकाणी शेतकऱ्यांना जर युरीया घ्यायचा असेल, तर एक युरीया गोणी मागे बाराशे रुपये किंमतीच्या 2 गोण्या खरेदी कराव्या लागत आहे. असा मनमानी कारोभार तालुक्यातील अनेक व्यापारी करीत आहे. सदरील दुकान श्रीराम कृषी सेवा केंद्र या दुकानावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी वर्गाने दिला आहे.

कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी औरंगाबाद येथे एका दुकानावर स्टिंग केले होते. मात्र याचा परिमाण जिल्ह्यातील व्यापारी वर्गाला झालेला दिसत नाही. म्हणुनच कृषीमंत्र्यांनी यासंबंधी दखल घ्यावी व अशा शेतकऱ्यांची पिळवणुक करणाऱ्या कृषीसेवा केंद्राचे परवाने रद्द करुन सील करावे अशी मागणी शेतकऱ्यांतुन व्यक्त होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies