पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्याला कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही - शरद पवार

शरद पवार आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी आज पूरपरिस्थितीची पाहणी केली आहे

उस्मानाबाद । राज्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार शरद पवार आज उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी ही भूकंपा इतकीच मोठी असल्याचे शरद पवार म्हणाले. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्राला कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांचं पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, पिक विमा योजनेत आता दुरुस्ती करण्याची गरज आहे. राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना यातून बाहेर काढणं हे राज्यासमोरील आव्हान असून त्यासाठी केंद्र सरकारकडे पुरावा करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज तुळजापूर येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केलं.

उस्मानाबाद जिल्ह्यात कापूस, ऊस, बाजरी, मका अशा पिकांचे सर्वाधिक नुकसान झालेलं आहे तसेच शेती खरडून वाहून गेल्यामुळे शेतकऱ्याचे वर्षभराचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीची तीव्रता पाहता शेतकऱ्याला मोठ्या मदतीची तसेच शेताच्या बांधबंदिस्तीची गरज असल्याचे ही पवार म्हणाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे ऊस गाळप अयोग्य झाला असून, अडचणीत सापडलेली साखर कारखानदारीमुळे अभावी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे चौकटीच्या बाहेर जाऊन मदत करण्याची गरज शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली. शेतकरी कायद्यातील काही मुद्द्यांना विरोध होतो आहे.

शेतातील उत्पादित होणाऱ्या मालाला भाव ठरवण्याचा अधिकार देण्यावरून काही राज्यात होणारा विरोध दिसतो आहे. किमान आधारभूत किंमती ठरवण्याचा अधिकार सरकारला आता राहणार नाही. कारण खाजगी व्यापारी आणि कंपन्या शेतमाल खरेदी करण्यास येण्यास वाव मिळाल्यामुळे किमान हमी भाव सरकार देणार की नाही याचा या कायद्यात कुठेही उल्लेख नसल्यामुळे काही राज्यात विरोध होत असल्याचे पवार म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies