कोरोनाचा धोका वाढणार; पण घाबरू नका, मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

अंदाजापेक्षा खूपच कमी कोरोना रुग्ण महाराष्ट्रात - उद्धव ठाकरे

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज परत एकदा राज्यातील नागरिकांसोबत संवाद साधला आहे. कोरोनाच्या परिस्थितीबाबत बोलतांना मुख्यमंत्र्यांनी राज्यात कोरोनाचा धोका वाढणार आहे. पण त्याची काळजी करण्याचं कारण नाही असं म्हंटल आहे. संपुर्ण महाराष्ट्रातील नागरिकांनी कोरोनासोबत लढा देण्यासाठी सरकारला सहकार्य केले आहे. कोरोनाशी आपण आतापर्यंत चांगलं लढत आहोत. मात्र असं असलं तरी आपल्याला अधिक सतर्क राहावं लागेल कारण यापुढची स्थिती अधिक बिकट असणार आहे. त्यामुळे या कोरोनाचा गुणाकार वाढत जाईल. धोका वाढेल, पण काळजी करण्याचं कारण नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू आहे. आरोग्य व्यवस्था मोठ्या प्रमाणात कामाला लागली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्याचबरोबर हे सरकार फक्त पोकळ घोषणा करणारं नाही. अशा शब्दात मुख्यमंत्र्यानी केंद्राच्या पॅकेजवर जोरदार टीका केली आहे.

राज्यातील परिस्थितीवर बोलतांना कोरोना रुग्णांची संख्या गुणाकारानं वाढत आहे. कोरोना संकट एवढं मोठ आहे की त्यावर तयारी करण्यासाठी सरकारला वेळ लागला असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. तसेच राज्यात दीड लाख कोरोना रुग्ण आढळतील असा अंदाज असतांना आतापर्यंत 43 हजार लोकांना त्याची लागण झाली आहे. हे सर्व जनतेनं शिस्त पाळली म्हणून आपण कोरोनाचा वेग कमी करू शकलो. राज्यात आतापर्यंत साडेतीन लाखाच्या जवळपास चाचण्या झाल्या आहेत.


मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

कोरोनाचा आकडा वाढणार आहे. त्यामुळे कृपा करून कोणीही काम बंद करू नका. सर्व आरोग्य सेवेसाठी महाराष्ट्र सरकार खंबीर आहे.

हा संकटाचा काळ आहे. त्यामुळे कोणीही राजकारण करू नये. तुम्ही करा. मी राजकारण करणार नाही कारण माझ्यावर राज्याची जबाबदारी आहे. मी प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यामुळे मला काम करू द्या.

31 तारखेपर्यंत लॉकडाऊन उठणार हा काही हो किंवा नाहीचा मुद्दा नाही. त्यामुळे याबद्दल सध्या काही सांगू शकत नाहीत.

पुढच्या काही काळात कोरोनाची प्रकरणं वाढणार आहेत. विषाणूच्या संसर्गाचा गुणाकार वाढतो आहे. पावसाळ्यात आणखी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

जरा लक्षणं दिसलं तरी डॉक्टरांकडे गेलं पाहिजे.

सर्दी खोकल्यापेक्षा ताप येणं, थकवा येणं, वास येत नाही, तोंडाची चव जाणं ही नवी लक्षणं आहेत. ती अंगावर काढू नका. ती कोरोनाची प्राथमिक लक्षणं असू शकतात.

पावसाळ्यात जास्त खबरदारी घेण्याची गरज, बाहेर फिरायला जाऊ नका.

व्हायरस कुणाकडे पोहोचायच्या आत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायचं - हे आपलं धोरण आहे

6 ते 7 लाखांपर्यंत मजूरांना त्यांच्या घरी पोहोचवलं

राज्याने आतापर्यंत 3 लाख मजूरांना बसने घरी पाठवलं

आपण रोज 80 ट्रेनची मागणी करतो, प्रत्यक्षात 40 मिळाल्या

राज्याने आतापर्यंत 481 ट्रेन पाठवल्या

राज्याने एसटीसाठी 75 कोटी रुपये दिले

मनोरंजन, खेळ अशा अनेक बाबींना परवाणगी देण्याचा विचार करू

रक्तदान करण्याचं आवाहन

सध्या राज्यात 8 ते 10 दिवस पुरेल इतका रक्तसाठा आहे. याआधी जेव्हा रक्तदानाचं आवाहन केलं होतं तेव्हा तुम्हाला थांबा असं सांगावं लागलं होतं. आता स्वतःची पूर्ण काळजी घेऊन रक्तदान करा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.  येत्या काळात रक्तदान करा, ते करताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.AM News Developed by Kalavati Technologies