शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारचीच - छत्रपती संभाजीराजे

परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, राज्य आणि केंद्र सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे

लातूर । मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परतीच्या पावसामुळे महाभयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना वाचवता आलं नाही तर कोणालाही उत्तर देता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रूपये मदत द्यावी. पुराव्यासाठी पंचनामे कराल पण त्याचे पैसे कधी मिळतील असा प्रश्न देखील छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला. त्यासाठी केंद्र सरकारने विमा कंपन्यांवर दबाव आणावा.

तसेच सरकारने लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे असल्याचेही संभाजीराजे म्हणाले. माझं तूझं करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य, केंद्र सरकारची असल्याचं वक्तव्य छत्रपती संभाजीराजे यांनी लातूर येथे केले. ओला दुष्काळ जाहीर करा तत्काळ त्याची अमंलबजावणी करा अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी राजकीय मंडळी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. तसेच सरकारने तात्काळ 25 हजार हेक्टरी मदत जाहिर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies