पुरबळींची संख्या 43 वर, कोल्हापूर, साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा

पूरबळींची संख्या 43 वर, आतापर्यंत 4,74, 226 नागरिकांचे स्थलांतर

पुणे । कोल्हापूर आणि सांगलीत आज आणखी तीन मृतदेह सापडल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पूरबळींची संख्या 43 वर पोहोचली असून अद्यापही 3 जण बेपत्ता आहेत, अशी माहिती देतानाच कोल्हापूर आणि साताऱ्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा वेधशाळेने दिला असल्याचं पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं.

म्हैसकर म्हणाले, की पुणे विभागामध्ये पडलेला पाऊस रेकॉर्डब्रेक आहे. यामध्ये अनेक प्रकारची हानी झाली आहे रविवारी दोन मृतदेह सांगली जिह्यामध्ये सापडले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही तर तीन जण बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्या व्यक्तींमध्ये एक व्यक्ती सांगली तर एक व्यक्ती कोल्हापूर आणि एक व्यक्ती सातारचे आहेत. आतापर्यंत 4,74, 226 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies