Corona Live Status : राज्यात कोरोना बाधितांची संख्या 302 वर, तर देशात 1500 रुग्ण

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एका दिवसात 230 वरुन थेट 302 वर पोहचली आहे.

मुंबई | देशभरात कोरोना व्हायरसचे थैमान काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. दर तासाला कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. दरम्यान आज राज्यात 82 नवीन बाधित रुग्णांची नोद झाली असून राज्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 302 वर गेला आहे. आजच्या 82 नवीन रुग्णांपैकी एकट्या मुंबईत 59 रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबई परिसरातल्या शहरी भागातील 13 रुग्ण आहेत, तसेच पुण्यात 5 रुग्ण, अहमदनगरमध्ये 3 रुग्ण आणि 2 रुग्ण बुलढाण्यातील आहेत. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.

महाराष्ट्र

कोरोनाग्रस्त रुग्ण - 302
मृत्यू - 10
बरे झालेले रुग्ण - 39

देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 1500 च्या पार गेली आहे. तर आतापर्यंत 45 जणांचा या आजाराने बळी गेला आहे. देशात सर्वात जास्त बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहे.

भारत

कोरोनाग्रस्त रुग्ण - 1550
मृत्यू - 45
बरे झालेले रुग्ण - 124

कोरोना व्हायरसने संपुर्ण जगात थैमान घातले आहे. आतापर्यंत जगात 838,951 जणांना कोरोनाची लागण झाली असून 41,353 जणांचा मृत्यू झाला आहे

संपुर्ण जग

कोरोनाग्रस्त रुग्ण - 838,951
मृत्यू - 41,353
बरे झालेले रुग्ण - 177,376

कोरोना व्हायरसबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अशा सुचना वारंवार दिल्या असतांना देखील काही टवाळखोर नागरिक हुल्लडबाजी करण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे दिसून आले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहेत. तसेच संयम आणि शिस्त ठेवून कोरोनाशी लढा दिला तर आपण नक्कीच कोरोनासोबतची लढाई जिंकू शकतो असं म्हंटल आहे. मात्र वारंवार सुचना देऊन सुद्धा नागरिक घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. अशा नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करणे सुरू केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies