राज्यात पुढचे तीन दिवस पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज

मुंबई वेधशाळेने 8 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे

मुंबई । राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. सोमवारी रात्रीच राज्यातील काही भागांत गडगडाट, वादळी वारे आणि जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. आज, मंगळवारी देखील राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे मान्सूनने निरोप घेऊनही मुंबईत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. 24 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाचा मुक्काम असणार असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.

राज्याच्या काही भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता कोकण, मध्य महाराष्ट्रात आहे. मराठवाड्याच्या काही भागातही जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. मुंबई वेधशाळेने 8 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातच ईशान्य मान्सून वाऱ्यांनी दक्षिण भारतात पावसाला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक भागात आर्द्रता कमी झालेली नाही.AM News Developed by Kalavati Technologies