जे न्यायाधीश सत्ताधारी विचारांच्या विरोधी विचारांचे त्याची बदली केली जातेय - जितेंद्र आव्हाड

केंद्र सरकार दंगली भडकवत आहे - जितेंद्र आव्हाड

मुंबई । गेल्या पाच ते सहा वर्षात आम्ही हे पाहिल आहे की, जे न्यायाधीश सत्ताधारी विचारांच्या विरोधी विचारांचे आहेत. त्याची बदली केली जात आहे. तसेच दिल्ली पोलीस ही दिल्लीची नाही तर केंद्राची आहे. अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तेसच केंद्र सरकार गुजरात दंगलीचे माॅडेल दिल्लीत अवलंबवत आहे. देशात स्वायत्त संस्था राहिली नाही, सर्व स्वायत्त संस्था ह्या केंद्राच्या दबावाखाली आहेत. केंद्र सरकार दंगली भडकवत आहे. अशीही टीका त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालायचे वरिष्ठ न्यायाधीश एस मुरलीधर यांची पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. एस मुरलीधर यांनी 26 फेब्रुवारी ला दिल्ली हिंसाचारा प्रकरणी सुनावणी करताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले तसेच चिथावणीखोर भाषण करणाऱ्या भाजप नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखिल पोलिसांना दिले होते. ते म्हणाले की, 'पोलिसांची कार्यप्रणाली ही संभ्रम निर्माण करणारी आहे. शहरात मोठ्याप्रमाणात हिंसा झाली आहे. 1984 च्या शीख विरोधी दंगलीचे साक्षीदार आम्हाला व्हायचं नाहीये.'AM News Developed by Kalavati Technologies