सरकारने गुंडगिरी करू नये; अन्यथा तुमची गाठ 'मराठा' समाजाशी - विनायक मेटे

आघाडी सरकार गुंडगिरी करत; मराठा समाजाला दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे असे मत विनायक मेटे यांनी व्यक्त केले आहे

औरंगाबाद । मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने औरंगाबादेतील क्रांती चौकात वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तसेच इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. मात्र, आघाडी सरकार तसेच अशोक चव्हाण यांच्या उपसमितीकडून आंदोलनकर्त्यांना गुंडगिरी करत दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया विनायक मेटे यांनी व्यक्त केली.

मेटे म्हणाले की, ''आघाडी सरकार आणि अशोक चव्हाण गुंडगिरीवर उतरले आहेत. त्यांनी मराठा समाजाचे प्रश्न सोडवावे, तसेच आरक्षण टिकवायला प्राधान्य द्यावे. सरकारने गुंडगिरी करू नये, व मराठा समाजाची दडपशाही करू नये. तुमची गाठ मराठा समाजाशी आहे ते तुम्हाला परवडणार नाही.'' अशा इशारा विनायक मेटे यांनी आघाडी सरकार व मंत्री अशोक चव्हाणांना दिला आहे.AM News Developed by Kalavati Technologies