खळबळजनक ! अल्पवयीन मुलीवर अत्याचार मुलगी राहिली गर्भवती

धारूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, एक जण अटक

धारूर । धारूर तालुक्यातील चोरांबा येथील सोळा वर्षीय मुलीचे आई वडील ऊस तोडणीसाठी गेलेले असताना ती आजीकडे राहत होती. डिसेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालाधीत गावातील एका मुलाने जबरदस्ती करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिचे पोट वर आल्याने तिला अंबाजोगाई येथील स्वाराति रुग्णालयात दाखवले असता ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी संबंधीत अत्याचारीत मुलीच्या तक्रारीवरून आरोपी उमेश रामप्रभू इरमले यांच्यावर लैंगिक अत्याचार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेखा धस या करत आहेत.
धारूर पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुली व महिलावरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असुन हि बाब गंभीर असल्याने पोलीस यंञणेने कडक भुमिका घ्यावी व अशा घटना वर अंकूश घालावा अशी भावना सर्वसामन्यातून व्यक्त होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies