दोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया

अनेकांनी या एन्काऊंटरचा विरोध केला असून ही कायद्याची पायमल्ली असल्याचे अनेकांचे मत आहे

मुंबई । हैद्राबाद घटनेतील आरोपींचे आज सकाळी एन्काऊंटर करण्यात आले. यानंतर देशभरातून संमीश्र प्रतिक्रीया येत आहे. अनेकांनी या एन्काऊंटरचे समर्थन केले आहे. तर अनेकांनी या एन्काऊंटरचा विरोध केला असून ही कायद्याची पायमल्ली असल्याचे अनेकांचे मत आहे. या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया समोर आली आहे. दोषींना मृत्यूदंडच मिळायला हवा मात्र तो कायद्याने असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, जेवढी माहिती मला मीडियाच्या माध्यमातून मिळालेली आहे. त्यानुसार एन्काऊंटर जे काही झालेलं आहे, त्यासंदर्भात लोकांमध्ये तीव्र भावना पाहायला मिळते. बलात्काऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असं लोकांचं मत आहे. आता माझ्याजवळ त्यासंदर्भातली जास्त माहिती नाही. त्यामुळे मी अधिक बोलणार नाही, पण बलात्काऱ्यांना मृत्युदंड मिळायला हवा आणि तो कायद्यानं मिळाला पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies