Mumbai Rain Update : मुंबापुरीला पावसाने झोडपले; आजही मुसळधार पावसाचा इशारा..

आजही मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत आज अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे

मुंबई । सोमवार पासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईसह अनेक उपनगरांत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. मुंबईत रात्रभर अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर आजही मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत आज अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे. कल्याणमध्येही काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पाऊसाने दमदार हजेरी लावली आहे.

काल संध्याकाळपासूनच पावसाची रिप-रिप सुरू आहे. संततधार पडत असलेल्या या पाऊसाचा जोर हा असाच कायम राहणार असून, दुपारच्या सुमारास पाऊसचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे. यावर्षी अधून-मधून हजेरी लावत असलेल्या पावसाची आतापर्यंत 39.7% इतकी नोंद हवामान खात्याकडे झाली आहे. या रात्रभर पडत असलेल्या रिप रिप मुळे संपूर्ण कल्याण डोंबिवली थंडावला आहे. आज पहाटे पासूनच रस्त्यांवर तुरळक गर्दी पाहायला मिळाली.AM News Developed by Kalavati Technologies