केंद्र सरकार महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत आहे - बाळासाहेब थोरात

फक्त मदत हेच लक्ष ठेऊन आपणा सर्वांना काम करण्याची गरज आहे असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.


राज्यावर सध्या पुराचं संकट आहे. सरकारसह अनेक ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र पूर परिस्थितीत सरकारने मदत पाठवायला उशीर केला असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. तसेच एल 3 सारखी पारिस्थिती असताना केंद्र सरकार महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी पूर परिस्थिती हेलिकॉप्टर मधून पाहणी केली असली तरी ते काही जमिनीवर उतरवून पाहणी का केली नाही असा खोचक टोल बाळासाहेब थोरात यांनी लगावला.

हजारो संसार या पुरात वाहून गेले आहेत. मोठ्या प्रमाणात दुभती जनावर मेल्याने अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. सध्या पुरानंतर पाणी ओसरायला सुरवात झाली असली तरी मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. शासन सर्वोतोपरी पूरग्रस्तांना मदत करत असल्याच मुख्यमंत्री सांगत आहेत. मात्र अजून केंद्र सरकारकडून मदत आलेली नाही. कोल्हापुर, सातारा सांगलीसह कोकणात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आहे. त्या पूरग्रस्तांना तातडीच्या मदतीची गरज आहे. सरकारकडून मदत पोहचवली जात आहे. त्यासोबतच अनेक संथा, राजकीय पक्ष आपापल्या परीने मदत पोहचवण्याच कार्य करत आहेत. कपडे, अन्याधान्य, पिण्याचे पाणी आणि औषधांची तातडीने गरज या सर्वांना आहे. त्यामुळे सध्या राजकारण आणि प्रसिद्धी बाजूला ठेवून फक्त आणि फक्त मदत हेच लक्ष ठेऊन आपणा सर्वांना काम करण्याची गरज आहे असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies