केंद्र सरकारचा मोठा निर्णय, डिजिटल मीडियावर असणार आता केंद्राची नजर

डिजिटल मीडिया केंद्र सरकारने आता माहिती प्रसारण मंत्रालयलाकडे सुपुर्द केले असून, आजपासून या प्लॅटफॉर्मवरती केंद्र सरकारची नजर असणार आहे

नवी दिल्ली । देशातील डिजिटल मीडिया हा आता केंद्राच्या माहिती आणि प्रसारण खात्याकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. यासंबधी केंद्र सरकारने आज निर्णय घेतला असून, मागील आठवड्याच्या मंत्रीमंडळात यासंबंधीच बैठक पार पडली होती. त्यामुळे आता डिजिटल मीडियावर माहिती प्रसारण मंत्रालय नजर ठेवणार आहे. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मला ग्राहकांची पसंती वाढत चालली आहे. कोरोनाच्या काळात तर अनेक चित्रपट याच प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले.

परंतु या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या कंटेन्टवर कोणताच अंकुश नसल्याची तक्रार वारंवार येत होती. त्यापार्श्वभुमीवर दखल घेत केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने याबाबत एक परिपत्रक जारी केले असून, या नियमानुसार ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची नजर असणार आहे. ऑडिओ, व्हिडीओ यासोबतच चालू घडामोडीवर भाष्य करणाऱ्या आणि बातम्या देणाऱ्या डिजिटल चॅनेल्सही आता केंद्र सरकारच्या कक्षेत असणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies