भारतीय जनता पार्टी म्हणजेच "भारत जलाव पार्टी" - नवाब मलिक

नवाब मलिक यांनी भारतीय जनता पार्टीचा उल्लेख "भारत जलाव पार्टी" असा केला आहे.

मुंबई | दिल्लीत झालेला हिंसाचार हा नियोजित होता असा आरोप राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर केला आहे. दिल्लीतल्या हिंसाचाराला गृहमंत्र्यांची सहमती असल्याने पोलिसांनी फक्त बघ्याची भुमिका घेतली असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. दिल्लीचा हिंसाचार गुजरातसारखा होता भारतीय जनता पार्टीने कितीही स्पष्ट केले तरी कुठे तरी दिल्ली हिंसाचार गुजरातसारखा करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तसेच  हिंसाचाराच्या बाबतीत नादिर शहाच्या नंतर अमित शहा यांच नाव इतिहासात नोंदवल्या जाईल असा टोला देखील नवाब मलिक यांनी लगावला आहे. 

संपूर्ण देशात NRC CAA, NPR विरोधात नागरिक आंदोलन करत आहेत. ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे त्या राज्यात आंदोलन दाबण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. महाराष्ट्रात सुद्धा कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था चोख राहिली आहे. संपूर्ण देशातले राज्य सरकार NPR ला विरोध करत आहेत. तरीही भाजपला या गोष्टीचे भान राहिले नाही. भारतीय जनता पार्टीला भारत जलाव पार्टी म्हणुन ओळखले जात आहे. भारतीय जनता पार्टीचे खरे रूप जनतेसमोर दिल्लीच्या दंगलीनंतर आले आहे. CAA हा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत. त्यामुळे या विषयावर विधिमंडळात चर्चा होऊ शकत नाही. असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies