महाड-पंढरपूर महामार्गावर अपघात, 40 प्रवाशांचा जीव वाचला

घटनास्थळी फलटण शहर पोलीस दाखल

फलटण । महाड-पंढरपूर महामार्गावर फलटण येथे बानगंगा नदी पुलावर बसचा अपघात MH.11.GP.4161 बस मुंबईहून दहिवडीच्या दिशेने निघाली होती. चालकाचा ताबा सुटून बानगंगा नदीवरील पुलावर धडकून कोसळली. यामध्ये 30 ते 40 प्रवासी होते. आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. काही प्रवाशांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फलटण शहराच्या हद्दीत घडला. घटनास्थळी फलटण शहर पोलीस दाखल झाले.

या मार्गावर अनेक वर्षापासून रस्त्याचे काम अपूर्ण आहे बानगंगा नदी पूल अरुंद असल्यामुळे सतत अपघात होत असतात. अनेक वर्षांपासून रस्ताचे काम खोळंबल्याने सतत अपघात होत असतात. प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे. दैवत बलवंत असल्याने 30 ते 40 प्रवाशांचा जीव वाचला संबंधित विभागाने लक्ष देणे आवश्यक आहे.AM News Developed by Kalavati Technologies